आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानसामाजिक

टाकळीभान न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिर उत्साहात

 

टाकळीभान : रयत शिक्षण संस्थेच्या टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील ज्यूनियर कॉलेज मध्ये आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एस . जरे उपस्थित होते तर मार्गदर्शक म्हणून श्रीरामपूर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम चे व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर थोरात उपस्थित होते .
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्ञानेश्वर थोरात यांनी गॅस गळतीचे होणारे दुष्परिणाम, गॅस गळती रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या यांविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगून गॅस गळती संबंधी प्रात्यक्षिके दाखविली .यावेळी व्यासपीठावर एच .पी . गॅसचे कर्मचारी मच्छिंद्र लगडे ,आशिष सरपते, विद्यालयाचे उपशिक्षक एस. एस . राठोड, एन .आर . पिदुरकर,एन पी चौधरी आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए .ए . पाचपिंड यांनी तर व्ही .डी . गोंदके यांनी आभार व्यक्त केले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!