ताज्या घडामोडी

महापालिकेचा निकृष्ट ड्रेनेज फ्रेम कव्हर बसवण्याचा घाट ; महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख

 

मिरज :  मिरज महापालिकेच्या वतीने चांगल्या व सुस्थितीत असलेले मिरज नगरपालिका अस्तित्वात असताना जे फ्रेम कव्हर मजबूत व लोखंडी होते ते काढून निकृष्ट व दर्जाहीन सिमेंटचे फ्रेम कव्हर बसवत आहे जेणेकरून काही दिवसातच ड्रेनेजचे सिमेंटचे नवीन फ्रेम कव्हर मोडकळीस येत असून या संपूर्ण कामाची चौकशी होऊन जिथे जिथे जुने लोखंडी मजबूत फ्रेम कव्हर काढून नवीन कव्हर बसवत आहे त्या ठिकाणी परत जुने कव्हर बसवावे… नवीन ड्रेनेज फ्रेम कव्हरच्या नावाखाली जुने शेकडो लोखंडी मजबूत फ्रेम कव्हर भंगार मध्ये घालण्याचा अधिकाऱ्यांचा मानस आहे काय? व ठेकेदारांना पोसणार आहे काय?असा प्रश्न मिरजकर जनतेला पडलेला आहे तरी संपूर्ण नवीन फ्रेम कव्हरची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई होणे अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष युवक सांगली जिल्हाच्या वतीने महापालिकेच्या भोंगळ कारभारा विरुद्ध आंदोलन छेडल जाईल.जुने लोखंडी फ्रेम कव्हर कोणाच्या आदेशाने काढले अशा मागणीचे निवेदन मिरज महापालिकाचे उपायुक्त स्मृती पाटील मॅडम व ड्रेनेज विभागाचे शाखा अभियंता डी.डी पवार साहेब यांना देऊन कारवाईची मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख,महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे मिरज कार्याध्यक्ष अजय बाबर,हजर टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख,शलमन भोरे,युवक मिरज शहर उपाध्यक्ष साद गवंडी, अल्पसंख्याक सेलचे मिरज शहर संघटक जैन सय्यद,आवेश सय्यद व नासिर बागलकोटे आधी बहुसंख्य महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!