सिद्धेवाडी येथील जि. प.च्या आदर्श मुख्याध्यापकांची बदली रद्दसाठी ग्रामस्थांचे आंदोलन, शाळा बंद ; जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या शब्दांला मान ,शाळा पुन्हा सुरू
प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांचा बदली रद्द पाठपुरावा करण्याचा शब्द ; ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त

दर्पण न्यूज मिरज सांगली :-
सिद्धेवाडी येथील जिल्हा परिषदेचे आदर्श मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी शाळा बंद करण्यात आली. यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांनी बदली रद्द करण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी बदली रद्द पाठपुरावा करणार शब्द दिल्यानंतर पुन्हा शाळा पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
सिद्धेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूलने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा योजनेअंतर्गत विभागांमध्ये प्रथम क्रमांक घेऊन 24 लाखाचे बक्षीस पटकावले होते आज या शाळेत विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळा बंद ठेऊन आंदोलन पुकारले होते यामागे कारण ही असे की ज्यांच्या प्रयत्नाला मुळे ही शाळा महाराष्ट्रात नावारूपाला आली ते मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांची बदली झाली आहे. ही बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तीव्र निदर्शना केली मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांनी सात वर्षात शाळेचा कायापालट केला आहे शाळेतील भौतिक सुविधा आणि गुणवत्तेवर त्यांनी भर देत 200 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेची आज 540 पटावर नेली आहे .मुख्यमंत्री सुंदर शाळा स्वच्छ सुंदर शाळा या योजनेअंतर्गत विभागांमध्ये प्रथम क्रमांक घेऊन 24 लाखाचे बक्षीस शाळेला मिळवून दिले. त्यांच्या प्रयत्नातून पश्चिम महाराष्ट्रातील इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण देणारी जिल्हा परिषदची ही पहिली शाळा म्हणून ओळखली जाते. मुख्याध्यापकांची बदलीचा शासनाने पत्र दिल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी या बदलीला विरोध करत मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. शाळा बंद ठेवून शाळे समोर निदर्शना करण्यात आली जनसूराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ सिद्धेवाडी येथे भेट दिली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी फोन वरून संपर्क साधून विद्यार्थी आणि पालकांच्या भावना पोहचवून त्यांनी बदली तात्काळ थांबवण्याचे मागणी केली. उमासे सरांची बदली थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेच्या वर्गात प्रवेश केल्याने शाळा पुन्हा भरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे ओमसे सर यांची बदली रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार असा विश्वास समित दादा कदम यांनी दिला आहे.
यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रवीण धेंडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते,सिद्धेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.