कागल येथे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३४ व्या जयंतीनिमित्त नामदार हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे);-
भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी अभिवादन केले. दरम्यान; शाहू उद्यानमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व श्री. बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गैबी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या पुतळ्यानाही श्री. मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, त्याकाळी दलित समाजावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंगात स्फुलिंग पेटले. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघर्ष करा व शहाणे व्हा, असा क्रांतिकारी मंत्र दिला. विषमतेने बजबजलेल्या समाजात समता आणि बंधुता नांदावी, या भावनेतून त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्याय या त्रिसूत्रीवर वाटचाल करण्यातच मानवजातीचे कल्याण आहे. या महामानवानी घालून दिलेले आदर्श आणि विचार आपण सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांनी घालून दिलेल्या वाटेवरून जाऊन त्यांचा अनुयय करूया, असेही ते म्हणाले.
यावेळी कागल पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी, नवल बोते, अस्लम मुजावर, अजित कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारी, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, सौरभ पाटील, बाबासो नाईक, सुधाकर सोनुले, नवाज मुश्रीफ, संजय ठाणेकर, संग्राम लाड, संजय फराकटे, जयंती समितीचे अध्यक्ष बच्चन कांबळे, उपाध्यक्ष क्रांती कांबळे, अक्षय घस्ते, खजानिस विवेक लोटे, सुरजकुमार कामत, रुपेश वाघमारे, गणेश कांबळे, भगवान कांबळे, राहुल कांबळे, उमेश कांबळे, तुषार भास्कर, तसेच डाॅ. आंबेडकरनगर आणि कागल शहरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.