सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातर्फे शेतकऱ्यांचा सत्कार
जादा ऊस उत्पादनामध्ये विजयसिंह पाटील, सदाशिव कुणकेकर, धोंडीराम चौगुले यांची बाजी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :-
जादा ऊस उत्पादनामध्ये विजयसिंह पाटील रा. मोजे सांगाव, सदाशिव कुणकेकर रा. हळदी, धोंडीराम चौगुले रा. सोनाळी यांनी बाजी मारली. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने आयोजित केलेल्या एकरी ऊस उत्पादनवाढ स्पर्धेमध्ये या शेतकऱ्यानी आपापल्या गटात विजेतेपद मिळविले.कागल येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्यावतीने एकरी जादा उत्पादन घेणाऱ्या सभासद शेतकऱ्यांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांनी पारंपारिक ऊसशेतीची मानसिकता बदलून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. कार्यक्षेत्रातील सुपीक जमिनीमध्ये एकरी ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी कारखाना सर्वतोपरी सहकार्य करील. कारखान्याने कितीही जादा दर दिला तरी उसाचे उत्पादन वाढविल्याशिवाय ऊस शेती परवडणार नाही. उत्पादन वाढीसाठी सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना कारखाना शेतकऱ्यांना नेहमीच सहकार्य करेल.
यावेळी
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी . पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे आदी उपस्थित होते .
विविध गटनिहाय पुरस्कार प्राप्त शेतकरी पुढील प्रमाणे,
आडसाली गट : प्रथम – विजयसिंह युवराज पाटील ( रा. मौजे सांगाव ), द्वितीय – ऋषिकेश अमर रावण (रा. कागल ), तृतीय – राजाराम देवू बंके ( व्हन्नूर ) .पूर्व हंगामी सुरु गट: प्रथम -सदाशिव बाळाराम कुणकेकर ( रा . हळदी ), द्वितीय – कृष्णात शामराव रेपे (रा. चौंडाळ ), तृतीय – अमित मानसिंग खोत ( रा . खडकेवाडा ).
खोडवा गट: प्रथम – धोंडीराम महादेव चौगुले (रा . सोनाळी ), द्वितीय – रूपाली पांडुरंग मगदूम ( रा . धामणे ), तृतीय – रविकांत आनंदराव पाटील ( रा . हसुर खुर्द ) .
वरील पारितोषिक प्राप्त शेतकऱ्यांना मान्यवरांच्या रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.