भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांची भेट

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे:)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपक्रम राबविण्यात आले या उपक्रमस्थळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांची भेट दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी उपस्थित राहून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
माणगाव येथुन महाराष्ट्र तसेच कर्नाटक मधून मोठ्या संख्येने ज्योत प्रज्वलित करून घेऊन आपल्या गावी जाण्यासाठी भीम अनुयायी उपस्थित असतात यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
या प्रसंगी महापुरुषांच्या इतिहासावर उजाळा टाकला. महापुरुषांची शिकवण, देशासाठी घेतलेले परिश्रम, आणि परिश्रमातून घडवून आणलेल्या अमोलाग्र बद्दल घडवुन आणला याची माहिती दिली.
या वेळी उपस्थित लोकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच मोठ्या संख्येने भीम अनुयायी यांची उपस्थिती होते.