सांगली येथे उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांच्याकडून निखिल बनसोडे यांचा सत्कार
निखिल बनसोडे यांनी केले जागतिक धम्म सेमिनार मध्ये भारतातर्फे आधुनिक भारतातील बौद्ध वारसांचे संवर्धन आणि जतन विषयावर संशोधन पेपर सादर

सांगली प्रतिनिधी : –
गेल्या हजारो वर्षापासून भारताची ओळख बौद्ध राष्ट्र म्हणून जगात आहे. जगतिक मानव कल्याणासाठी म्हणून ओळखले जाणारे विचार बौद्ध विचार म्हणून जगामध्ये मान्यता प्राप्त झाली आहेत. असे विचार आत्मसात करून प्रत्येक युवकाने प्रत्येक पातळीवरती पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा बुद्धांचा विचार समाजातील प्रत्येक स्तरावरती प्रसारीत केला पाहिजे आणि हेच काम आयुष्मान निखिल बनसोडे यांनी मलेशिया या ठिकाणी जागतिक बौद्ध विचारवंतांच्या परिषदेमध्ये संशोधनाच्या माध्यमातून मांडले आहेत. असे प्रतिपादन यशस्वी उद्योजक सी.आर
एस.ग्रुपचे चेअरमन मा.सी.आर.सांगलीकर साहेब यांनी व्यक्त केले. जागतिक धम्म सेमिनार मध्ये भारतातर्फे आधुनिक भारतातील बौद्ध वारसांचे संवर्धन आणि जतन या विषयावर संशोधन पेपर सादर केला त्याबद्दल निखिल यांच्या सत्कार प्रसंगी मा.सांगलीकर साहेब बोलत होते.
पुढे ते म्हणाले की अजूनही भारतामध्ये अशा अनेक ठिकाणी बौद्ध कार्यांच्या विचारांच्या सांस्कृतिक खुणा दिसून येतात त्याचे संशोधन करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी निखिल बनसोडे यांच्यासारख्या अनेक अभ्यासकांची गरज आहे. निखिल ने आपल्या अभ्यासामध्ये अनेक घटना जागतिक पातळीवरती मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याची अभ्यासाची वृत्ती, संशोधक गुण, समाजाप्रती असणारी तळमळ, बुद्ध विचारांशी असणारी जवळीक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारी सामाजिक चळवळ हे गुण दिसून येतात. हे त्यांचे गुण आजच्या युवकांनी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. शेवटी त्यांनी निखिल बनसोडे यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व सी.आर.सांगलीकर फौंडेशन च्या वतीने सत्कार केला. याप्रसंगी प्रा.डॉ.बाळासाहेब कर्पे, मा. संजय भाऊ बनसोडे, इंजिनियर अक्षय बनसोडे, संजय होवाळे, मा. सुरेश माने, मा.भारत शिंदे, सचिन इनामदार, प्रदीप कांबळे, महेश शिवशरण, पत्रकार अभिजीत रांजणे अविनाश जाधव, चंद्रकांत चौधरी, सुनील पाटील विश्वस मागाडे, आदी मान्यवर उपस्थित होते.