महाराष्ट्रसामाजिक
सार्वजनिक वाचनालय भिलवडीच्या वतीने सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त रूपाली मोकाशी पाटील यांचा सत्कार

दर्पण न्यूज भिलवडी :- मूळच्या भिलवडीचा आणि सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे स्थायिक झालेल्या सौभाग्यवती रूपाली मोकाशी पाटील यांनी आज रविवार दिनांक 28 रोजी सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेत सदिच्छा भेट दिली. सौभाग्यवती रूपाली मोकाशी पाटील यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा आधुनिक सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे , याबद्दल वाचनालयाचे वतीने त्यांचा शाल आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची पूर्ण माहिती उपस्थितांना दिली. यावेळी उपाध्यक्ष डी आर कदम कार्यवाहक सुभाष कवडे संचालक जयंत केळकर प्रमुख लेखनिक सौभाग्यवती विद्या निकम गजानन माने पत्रकार घनश्याम मोरे श्रीमती सुनंदा मोकाशी व वाचक टकले गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.