DRM राजेश वर्मा किर्लोस्करवाडीला आले अन् कधी गेले ; अख्तर पिरजादे

दर्पण न्यूज पलूस :-
भारतीय रेल्वेचे पुणे विभागाचे रेल मंडल प्रबंधक, डी आर एम राजेश वर्मा हे सकाळी सात च्या सुमारास किर्लोस्कर वाडी येथे आले, त्यांनी अर्धा तास पाहणी केली आणि गेले, DRM येणार आहेत याची माहिती किर्लोस्कर वाडी येथील कोणालाही झाली नाही, रेल्वे प्रवाशांना नव्हती, प्रवासी संघटनेला नव्हती की रेल्वे चे प्रश्न घेऊन आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांना ही याची माहिती झाली नाही. अचानक आल्याने काहींची तारांबळ उडाली,काहींना तर ते आल्याचे गेल्यानंतर कळाले.सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी 26 जून रोजी लाक्षणिक उपोषण केले होते नंतर ते 3 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत.रेल्वे ची किर्लोस्करवाडी येथे उड्डाणपूल आणि भुयारी पूलाची कामे सुरु आहेत. ती नागरिकांना त्रासाची होणारी आहेत. वाहनाना वळण घेता येणार नाही, उड्डाणपूल उतरल्यावर समोर 50 फुटावर भिंत, त्यामुळे अपघात होणार आहेत अनेकांचे प्राण जाणार आहेत,ऊस वाहतूक होणार नाही. बैलगाडीची ऊस वाहतूक तर होणारच नाही. यासह 22 मागण्या घेऊन पिरजादे यांनी आंदोलन पुकारले आहे. त्या अनुषंगाने किर्लोस्करवाडी च्या कामाच्या स्थितीची माहिती घेण्याकरिता ते आले असावेत, रेल्वे नी महा रेल एम आर आय डी सी च्या सुरु असलेल्या दोन्ही पुलाच्या कामाची माहिती वर्मा यांनी घेतली. रेल्वे गेट ला पण भेट देऊन पाहणी केली.रेल्वे स्टेशनच्या छतावर पावसाने एक भले मोठे झाड पडल्याचे ही त्यांनी पाहिले असावे अशी माहिती पिरजादे यांनी बोलताना दिली. रेल मंडल प्रबंधक राजेश वर्मा सारखे मोठे अधिकारी किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर येऊन देखील त्यांनी रेल्वे प्रश्ना संदर्भात आमची भेट घेतली नाही, त्यांच्या दौऱ्याची माहिती देखील आम्हाला कळवली नाही याबद्दल अख्तर पिरजादे यांनी नाराजी व्यक्त केली.