किर्लोस्करवाडी येथे महारेलकडून रेल्वेची चुकीची कामे : अख्तर पिरजादे यांचे आंदोलन
MRIDC रेल्वे च्या कामाची चौकशी व्हावी ; लोकनेते जे के बापू जाधव यांचा आंदोलनास पाठिंबा

दर्पण न्यूज पलूस :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील किर्लोस्कर वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी रेल्वे च्या मागण्या संदर्भात किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर लाक्षणिक उपोषण केले. मागण्या मान्य नाही झाल्या तर तीन जुलैपासून बे मुदत ठिय्या आंदोलन करणार असल्या बाबत रेल्वेच्या एमआयडीसी मारेल या विभागाकडून जे किर्लोस्करवाडी येथे किंवा काही ठिकाणी जी कामे चालू आहेत ते चुकीच्या पद्धतीने चालू आहेत त्या कामाची चौकशी व्हावी उड्डाणपूल, भुयारी पूलचे डिझाईन चुकले आहे याची माहिती दीड वर्षांपूर्वी आमदार अरुण लाड यांच्या सह झालेल्या बैठकीवेळी त्यांना आधीच दिली होती तरी देखील त्यांनी कामे सुरू केली. ही दोन्ही पूलाची कामे चुकीची आहेत.त्या पुलावरून जाता येता अपघात होणार आहेत, उड्डाणपूल उतरल्यावर समोरच 50 फुटावर आडवी भिंत शून्य अंशातून लगेच घेतलेले वळण तसेच उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडील दुसऱ्या बाजूला वळण घेऊन उड्डाणपुलावर येण्याकरिता चा अरुंद रस्ता त्यामुळे वाहनाची कसरत होणार आहे. वाहन पुलावर जाणारच नाही, अपघात होऊन अनेकांचे प्राण जाणार आहेत. तरी कामाची चौकशी व्हावी चुकीची कामे होऊ नयेत, नागरिकांना याचा त्रास झाला नाही पाहिजे यासह, प्रीमियम तात्काल तिकीट पद्धती बंद झाली पाहिजे, कोयना एक्सप्रेस ला पूर्वी प्रमाणे 7 जनरल डबे असावेत, कोल्हापूर पुणे या एक्सप्रेस ची स्पेशल ट्रेन च्या नावाखाली रेल्वे प्रवाशाकडून वाढीव तिकीट दर घेऊन होणारी लूट बंद व्हावी, हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस, तसेच मंत्री प्रतीक पाटील आणि खासदार संजय काका पाटील यानी सुरु केलेली यशवंतपूर,अहमदाबाद, अजमेर, जोधपूर या गाडीला किर्लोस्करवाडी येथे थांबा मिळावा, किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन वर दोन्ही प्लॅटफॉर्म वर स्वच्छता गृह लिफ्ट ची सोय दक्षिणेकडे प्रवाशांना येजा करण्याकरिता आणखी एक जीना, तसेच उन, पाऊस या पासून संरक्षण व्हावे म्हणून सर्व प्लॅटफॉर्म वर शेड ची उभारणी व्हावी,पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय व्हावी यासह आणखी मागण्याकरिता पिरजादे यांनी आंदोलन हाती घेतले आहे.
सकाळी 9:00 वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मन्सूर मुजावर यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी दहा वाजता लाक्षणिक उपोषणास सुरवात केली. यावेळी, ज्येष्ठ नेते जे के बापू जाधव, मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर भैय्या जाधव, इंद्रप्रस्थ संस्थेचे चेअरमन संग्राम दादा पाटील, व्हाईस चेअरमन अधिक चव्हाण,रामानंदनगर चे माजी सरपंच जयसिंगराव नावडकर, युवक काँग्रेस चे जिल्हाअध्यक्ष डॉ सुशील गोतपागर, दुधोंडीचे माजी सरपंच विजय आरबूने ताजबी शिकलगार, मन्सूर मुजावर, पलूस चे व्यापारी धनाजीराव शेंडगे, राष्ट्रवादी चे दीपक मदने, बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चे संदीप वाघमारे आणि विनायक कांबळे, बुर्ली चे उपसरपंच उमेश पाटील, मध्य रेल्वेचे माजी सल्लागार श्रीकृष्ण औटे, बुर्ली चे पोलीस पाटील सचिन सुतार, रामानंद नगर चे पोलीस पाटील इम्तियाज मुल्ला, डॉ. दीपक चौगुले,बबन माने, विष्णू सुतार, एस वाय पाटील,कुमार कांबळे, अमर शिसाळ, राजाराम कटारे, मानवाधिकार संघटनेच्या अश्विनी मिठारी, मुबीन पठाण, दिलीप रकटे, रमेश लोखंडे, उदय सुतार, शकील पठाण, बापुसो मिठारी, संजय जाधव,निशिकांत रकटे, अशपाक शिकलगार, शहिदा पिरजादे,भाजपा चे विजय लोंढे, महादेव देसाई,अमित साळुंखे,अनिल जाधव,शीतल सावळवाडे, अस्लम संदे, जमीरखान पठाण यांच्या सह शेकडो प्रवाशांनी भेटून आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी अख्तर पिरजादे म्हणाले की माझ्या मागण्याकरिता हा लढा मी सुरु ठेवणार आहे. जर का रेल्वे प्रशासन आणि केंद्र शासनाने माझ्या मागण्यांचा विचार करून सोडवणूक केली नाही तर मी माझे आंदोलन अधिक तीव्र करणार आहे वेळ प्रसंगी खासदार विशाल दादा पाटील यांच्या निवास स्थानासमोर आंदोलन करू जेणेकरून याचा विचार केंद्र शासनाला घ्यावा लागेल.
जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार दीप्ती रिठे, निवासी नायब तहसीलदार डॉ आस्मा मुजावर, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच मिरज रेल्वे लोहमार्ग पोलीस चे पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण आणि त्यांचे सहकारी आणि पलूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील,पोलीस माळी दादा यांचे ही सहकार्य लाभल्याचे पिरजादे यांनी सांगितले.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त होता.
यावेळी जे के बापू जाधव म्हणाले, की अख्तर पिरजादे यांच्या मागण्या रास्त आहेत त्या सोडवल्या पाहिजेत, जयसिंग नावडकर म्हणाले,अख्तर पिरजादे यांच्या आंदोलनात आम्ही सर्व रामानंद नगर वासिय आहेत भविष्यात हे आंदोलन तीव्र करू.
संध्याकाळी पावणे सात वाजता माजी सरपंच जयसिंग नावडकर आणि ताजबी शिकलगार यांच्या हस्ते अख्तर पिरजादे यांनी लिंबू सरबत घेऊन लाक्षणिक उपोषण सोडले.
बुर्ली ग्रामपंचायतीचे पाठिंब्या चे पत्र
बुर्ली ग्रामपंचायत च्या वतीने उपसरपंच उमेश पाटील, डॉ दीपक चौगुले यांनी सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंब्याचे पत्र दिले. हा पूल म्हणजे बुर्ली गावाला अन्याय करणारा आहे. या मागण्याकरिता प्रसंगी आम्हीही आंदोलनात भाग घेऊन आंदोलन अधिक तीव्र करू. आणि रेल्वे प्रशासनाला नागरिकांच्या हिताचा निर्णय घेणेस भाग पाडू..
आर पी एफ चा नियोजित ठिकाणाला विरोध
सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी किर्लोस्कर वाडी रेल्वे तिकीट खिडकी समोरील रिकाम्या जागेत आंदोलन करणार असल्याचे निवेदनाद्वारे पंधरा दिवसापूर्वी स्पष्ट केले होते परंतु अचानक आंदोलनादिवशी आर पी एफ चे पोलीस शिपाई यांनी तुम्ही या जागेत आंदोलन करू शकत नाही बाहेरील बाजूला आंदोलन करा असे सांगितले. त्यावर अख्तर पिरजादे यांनी रेल्वे स्थानका बाहेर उघड्यावर आपले आंदोलन सुरु ठेवले. एक वेळ तर तास भर पाऊस आला त्यावेळी त्यांनी रेन कोट परिधान करून अक्षरशः पावसात भिजत त्यांनी आपले आंदोलन सुरु ठेवले.