मिरज शहरातून जयश्री ताई कुरणे यांचा तर एरंडोलीतून शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश ; प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांची उपस्थिती
जन सुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या रांगा

दर्पण न्यूज मिरज :- जन सुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करण्यासाठी रांगा लागल्या असून मिरज शहरातून जयश्री ताई कुरणे यांचा तर एरंडोली गावातून शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करण्यात आला. या पक्ष प्रवेश जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सांगली जिल्ह्या मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेशाची शृंखला सुरूच असून प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या धडाडीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्ष्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक मातब्बर नेते प्रवेशाच्या वाटेवर आहेत ,मिरज शहरातून आज भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयश्रीताई कुरणे यांनी महिला समर्थकांच्या सोबत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला ,तर मिरज पूर्व भागातील एरंडोली गावातून असंख्य कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते प्रवेश पार पडला.
यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते मा महादेव (अण्णा) कुरणे माजी नगर सेवक आनंदा देव माने समिर मलगावे जिल्हा प्रमुख अनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉ पंकज म्हेत्रे अनुसूचीत जाती जमाती जिल्हा अध्यक्ष प्रविण धेंडे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर शिवलिंग मेंढे सुशील माळी विनायक शेरबंदे कासम मुल्ला विनायक रुईकर जयसिंग चव्हाण सोनी संचालक अमर दादा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते, जनसुराज्य शक्ती पक्षाचा प्रवेशासाठी रांगा लागल्या असून लवकरच आणखीन मोठे धमाके पाहायला मिळतील असे सूचक वक्तव्य समित दादा कदम यांनी केले आहे.