क्रीडामहाराष्ट्र

अकरा वर्षाखालील मुला-मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत इचलकरंजीचे वेदांत बांगड, सांची चौधरी अजिंक्य तर विवान सोनी, थिया शहा उपविजेते

 

कोल्हापूर ः अनिल पाटील

चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या सहकार्याने चेस असोसिएशन इचलकरंजी आयोजित अकरा वर्षाखालील कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी,दाते मळा, या ठिकाणी काल संपन्न झाल्या. कोल्हापूर,जयसिंगपूर, वारणानगर, गडहिंग्लज व स्थानिक इचलकरंजी येथील नामांकित 103 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री तानाजी पवार (माजी उपनगराध्यक्ष ) व प्रमोदजी सोनी व विशालजी कांबळे व कॉ.सदा मलाबादे तसेच रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील व सेक्रेटरी चंद्रकांत मगदुम या मान्यवरांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले.
या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम सातव्या फेरीनंतर इचलकरंजीच्या वेदांत बांगडने सात पैकी सात गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले, इचलकरंजीचा विवान सोनी याने सातपैकी सहा गुण मिळवून सरस टायब्रेक गुणानुसार उपविजेतेपद मिळवले तर सहा गुण मिळवणाऱ्या कोल्हापूरच्या अवनीश जितकरला तृतीय स्थान मिळाले.
मुलींच्या गटात अंतिम पाचव्या फेरीनंतर इचलकरंजीची सांची चौधरी पाच पैकी पाच गुण मिळवून अजिंक्य ठरली, इचलकरंजीची थिया शहा ने चार गुणासह सरस टायब्रेक गुणानुसार उपविजेतेपद संपादिले तर कबनूरच्या श्रुती पांडवला चार गुणासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. दोन्ही गटातील विजेत्यांना एक हजार रुपये व चषक तर उपविजेत्याना व तृतीय क्रमांकास रोख पाचशे रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभ रोटरी अध्यक्ष श्री संतोष पाटील व रोटरी सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम तसेच सौ.पूनम सोनी मॅडम व चेस असोसिएशन इचलकरंजीचे अध्यक्ष विजय सलगर व सचिव रोहित पोळ यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी यावेळी संचालिका अस्मिता नलवडे,हेमा सलगर, ज्योती हत्तरसंग,शरण सलगर आदी उपस्थित होते
या स्पर्धेतून पुणे येथे 13 ते 15 जून रोजी होणाऱ्या अकरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा निवड करण्यात आलेले संघ पुढील प्रमाणे
मुले 1)वेदांत बांगड इचलकरंजी 2) विवान सोनी इचलकरंजी.
मुली 1) सांची चौधरी इचलकरंजी 2) थिया शहा इचलकरंजी.
*उत्तेजनार्थ बक्षीस हे पुढील प्रमाणे*
*सात वर्षाखालील गट – मुले* 1)अद्वैत कुलकर्णी , 2)स्वरीत गवंडी, 3)सुयोग काकाणी 4) श्लोक साळुंखे 5) श्रेयश पांडव
*मुली* 1) वाणी मालो 2)शार्वी कानिटकर 3)ओमिता मांगावकर 4) चार्मी शहा 5)नक्षत्रा कांबळे
*नऊ वर्षाखालील गट – मुले* 1)अथर्वराज ढोले 2)हर्ष मादनाईक 3)सुदर्शन पाटील 4) क्षितिज चौगुले 5) ऋतुराज पाटील
*मुली* -1) सांची बजाज 2) मनस्वी शिरगुरे,3) शनाया मालानी 4) कृष्णा पाटील 5) अद्विता ऐतवडे.
*अकरा वर्षाखालील गट – मुले* शौर्य खावत, आराध्य ठाकूर देसाई, अन्वय भिवरे,आदित्य ठाकूर,दिविज कात्रुट,वन्सिल ठक्कर व शर्मन सामंत.
*मुली* स्पृहा शेडशाळे ,स्वरा पाटनी ,गार्गी गुरव ,प्रज्ञा पोर्लेकर, अन्वेशा सोनी, दर्शना मिरजी व नारायणी घोरपडे या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक व मेडल देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय पंच करण परीट व राष्ट्रीय पंच रोहित पोळ, राज्यपंच विजय सलगर, अस्मिता नलवडे, शरणाप्पा सलगर झाकीर हूनगुंद, अथर्व तावरे, रुद्र माने, गोरे या सर्वानी अथक परिश्रम घेतले, यावेळी सर्व पालक शिक्षक व खेळाडू जास्त संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!