महाराष्ट्र
पलूस तहसीलदार दीप्ती रिठे यांना मातृशोक

दर्पण न्यूज पलूस :- पलूस च्या तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या आई सौ कांता शंकर रिठे ह्या दिनांक 2 जुन रोजी अल्पशा आजाराने 75 वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पाठीमागे एक मुलगा दोन मुली सून नातू नाती जावईअसा परिवार आहे. त्यांचे रक्षा विसर्जनचा विधी दिनांक 4 जुन रोजी खंडाळा पारगाव या ठिकाणी होणार आहे. त्यांनी आपल्या जीवनात आपल्या कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षीत.करणेसाठी विशेष प्रयत्न केले. त्याचा मुलगा अधिकारी व थोरली मुलगी डॉक्टर व लहान मुलगी तहसीलदार पदावर कार्यरत आहे.