भिलवडी साखरवाडी येथील श्री बिरूदेव सिद्धेश्वर देवाचा 24 पासून परडी सोहळा : विजय वावरे

दर्पण न्यूज भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी साखरवाडी येथील श्री बिरूदेव सिद्धेश्वर देवाची परडी सोहळा शनिवारपासून तीन दिवस होणार असल्याची माहिती धनगर समाजाचे अध्यक्ष विजय वावरे यांनी दिली.
साखरवाडी येथील मंदिरामध्ये शनिवारपासून सांस्कृतिक कार्यक्रमाने परडी सोहळा होणार आहे शनिवार दिनांक २४ रोजी निमंत्रित वालुंग मंडळे जमा होणार आहेत. रात्री १० वाजता धनगरी ओव्याचा कार्यक्रम तर रात्री बारानंतर परडी सोडण्याचा कार्यक्रम ढोलाच्या निनादात व आतषबाजीत कृष्णा नदीमध्ये सोडली जाणार आहे तेथे हेडाम भाकणूक होणार आहे. तर रविवार दिनांक २५ रोजी सकाळी दहा वाजले पासून श्री. च्या पालखीची भव्य मिरवणूक भिलवडी गावातून होणार आहे यामध्ये धनगरी ढोल वादन गजनवृत्त लेझीम ओव्या असे सांस्कृतिक कार्यक्रम चौका चौकात होणार आहे. भारत- पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना मानवंदना दिली जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता महाप्रसाद होणार आहे. ओव्या खड्या कथा असा कार्यक्रम रात्री दहा वाजल्यापासून आहे. सोमवार दिनांक २६ मे पहाटे भंडारा फोडला जाणार आहे. निमंत्रित ढोलांना पाचशे रुपये चे मानधन व मानपान दिला जाणार आहे. या सोहळ्याचे नियोजन धनगर समाजातील युवक व जेष्ठ नागरिक करत आहेत.