आरोग्य व शिक्षणग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक

देशभूषण हायस्कूलच्या स्नेहा शिवाजी शिंगेचे दहावी परीक्षेत यश ; खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून कौतुक

 

दर्पण न्यूज कोल्हापूर प्रतिनिधी अनिल पाटील : घरची प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा स्वतःच्या प्रयत्नाने शिक्षणाच्या क्षेत्रात देशभूषण हायस्कूलची विद्यार्थिनी ८५:८०% घेऊन उज्वल यश मिळवत कु. स्नेहा कोमल शिवाजी शिंगे हिने यंदाच्या इयत्ता १० वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिच्या या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे . खासदार धनंजय महाडिक यांनी स्नेहा शिंगे हिचे
चांगले गुण घेऊन यश मिळवल्याने कौतुक करत पुढील शिक्षणासाठी सहकार्य करण्याची ग्वाही देत अभिनंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
स्नेहा शिंगे ही एक मन लावून अभ्यास करणारी, शिस्तबद्ध आणि मेहनती विद्यार्थिनी आहे. तिच्या यशामागे तिचे आई-वडील, शाळेतील शिक्षक आणि स्वतःची प्रचंड मेहनत हे घटक कारणीभूत आहेत. घरातील अभ्यासाचा पोषक वातावरण, वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे तिने हे यश मिळवले असल्याचे घरातील पालक सांगतात स्नेहाने यशाचे श्रेय तिच्या आई-वडिल, मावशी आणि शिक्षकांना दिले आहे. “माझ्या यशामागे माझ्या आई-वडिलांचे सततचे प्रोत्साहन आणि माझ्या शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन हेच प्रमुख आहे. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मला मानसिक बळ दिले, शिक्षकांच्या योग्य व सातत्याने मार्गदर्शन त्यामुळे मी हे यश मिळवू शकले,” असे स्नेहा अभिमानाने सांगते.
शाळेचे मुख्याध्यापक आर,एक, गाट/वर्गशिक्षका मानसी माने मॅडम सांगतात, “स्नेहा ही अत्यंत हुशार शांत स्वभाव आणि अभ्यासू मुलगी आहे. ती नेहमीच जिज्ञासू वृत्तीने अभ्यास करत असे. तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, याबद्दल शंका नाही.” शाळेतील सर्व शिक्षक अनिल पाटील सर, सुरेश पाटील सर, अलमाने सर, वाघरे सर, यांनी घरी येऊन भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
तिच्या या उत्तम निकालामुळे पत्रकार,नातेवाईक, मित्रमंडळी व हितचिंतक आणि शिक्षकांकडून शुभेच्छा मिळत आहेत.
तिच्या मेहनतीची ही पावती भविष्यात तिला आणखी मोठे शिखर गाठण्यासाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!