आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञान

पालकांनो सजग व्हा …!दहावीच्या मार्क्सनी हुरळून जाऊ नका…!

 

 

काल नुकताच दहावीचा निकाल लागला,अनेकांना ९० ते १००% गुण मिळाले,तर काहींना अपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळाले…भरभरून मार्क्स ची उधळण मार्कलिस्ट वर दिसून आली.प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याने मिळविलेल्या गुणांचा सार्थ अभिमान वाटला असेल .पण हे मिळविलेले गुणांची आता आपण सत्यता पाहूयात.
एका मुलाला ४५६ गुण मिळाले अस आपण आता गृहीत धरूयात म्हणजे त्याच्या गुणांची टक्केवारी ४५६*१००/५००=९१.२० गुणपत्रिकेवर आलेली असेल.हे झाले त्याचे बेस्ट ऑफ फाईव्हचे गुण. म्हणजे त्याला ६ पैकी ५ विषयातील सर्वात जास्त असलेले गुण धरलेले.या सहा विषयात त्याला न कष्ट करता मिळालेले प्रॅक्टिकल चे आयते प्रत्येक विषयाचे २० गुण म्हणजे ते १२० गुण.म्हणजे ४५६-१२०=३३६ गुणांचीच लेखी परीक्षा दिलेली आहे.
आता प्रत्येक पेपरची आपण कठिण्यपातळी विचारात घेऊ यात.सर्व पेपर्स मध्ये तेथेच उतारा,तेथेच प्रश्न ,एका वाक्यात उत्तरे,गाळलेल्या जागा भरा असे ऑब्जेक्टीव्ह टाइप प्रश्न..!आकलन कृती, अभिव्यक्ती,स्वमत (भाषा विषय)त्यात दीर्घ उत्तरे वगैरे खूप कमी .
आता हेच ४५६ च्या ऐवजी त्या विद्यार्थ्यचे सर्व विषयाचे गुण घेऊयात ५२४ गुण घेऊयात.५२४*१००/६००=८७.३३ ते गुण होतील.
आता आपण ५२४-१२०=४०४ गुण होतील.(१२० प्रॅक्टिकल चे आयते गुण, प्रत्येक विषयाचे २० प्रमाणे गुण) आता या ४०४ ची टक्केवारी आपण पाहू यात ४०४*१००/४८०=८४.१६ ℅ होतात…
बेस्ट ऑफ फाईव्ह एवढे आत्मघातकी गुण आहेत की यावर पालक म्हणून आपण विचार केला पाहिजे, या गुणांच्या आधारे अनेकांना लातूर ,कोटा,नांदेड अशा ठिकाणी जाण्याचे वेध लागले असतील,पण या खाजगी वर्गांना पाठविण्यापूर्वी आपणच आपल्या मुलांचे गुण तपासले पाहिजेत,जरी बोर्ड म्हणत असेल की सर्व परीक्षा आम्ही कॉपी मुक्त राबविली आहे,तरी काही ठिकाणी परिस्थिती वेगळी होती.आपल्याला त्या विषयात जायचे नाही.
आपल्याला उद्याचा होणार खर्च पहायचा आहे.लातुर ,कोटा , लखनौ, नांदेड, इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई येथील खाजगी क्लासेस च्या जाहिराती पाहून आपले पाल्य या गुणांच्या आधारे या ठिकाणी जाण्याचा,प्रवेश घेण्याचा नक्की विचार करतील..पण पालक म्हणून आपण या सर्व गुणांची पडताळणी स्वतः करा मग ठरवा…आज लातूरला खाजगी क्लाससाठी पाल्याला तेथे ठेवायचे म्हटले तर किमान रोजचा खर्च १४०० रु आहे आणि तो किमान ५०० दिवस होणार आहे.(त्यात ट्युशन फी,शाळेची फी,होस्टेल, पुस्तके ,वह्या,जाणेयेणे व इतर किरकोळ खर्च यांचा समावेश आहे)
आजचा पाल्य तेथे शिकविणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता काय आहे? असलं काही पहात नाही,तो पहातोय की तेथील वातावरण,बिल्डिंग एखादया चित्रपटातील कॉलेज प्रमाणे आहे का..! बस झालं..आजच्या लेकरांना जाहिरातीतील चित्रांचे एवढं अनुकरण करायची सवय झाली आहे की ही पिढी वास्तव समजून घेयला तयारच नाही..समजा एखाद्या मुलाने नीट किंवा जेजेई साठी या बेस्ट ऑफ फाईव्हच्या गुणांवर लातूर , कोटा किंवा अशा इतर महागड्या ट्युशन क्लास साठी प्रवेश घेतला आणि दोन वर्षात साधारण ८ ते ९ लाख घालविले आणि त्याला नीट ला किंवा इतर परीक्षेमध्ये ५०० च्या आत मार्क्स पडले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही,त्यापेक्षा आपल्या स्वतःच्या गावातच राहून उपलब्ध साहित्याचा आधार घेऊन,युट्यूब किंवा नेट च्या मदतीने प्रॉपर अभ्यास केला तर एखाद्या महागड्या क्लासला जाऊन जेवढे मार्क्स पडतात त्यापेक्षा जास्त मार्क्स तो घरच खाऊन घेऊ शकतो हे ही एक सत्य आहे.या महागड्या क्लास ची फी देण्यापेक्षा दोन वर्षात जेवढी बचत होते त्यातून आपण जरी मार्क्स नाहीत पडले तर एखाद्या चांगल्या कॉलेज मध्ये फी भरून प्रवेश घेऊ शकतो हे देखील एक सत्य आहे,आणि पालक १२ वी झाल्यावर मग म्हणतात असे केले असते तर बरे झाले असते.
पालकांनो आजच वरील सर्व गुणांचा विचार करा…निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या.यासाठी हा लेखन प्रपंच आहे.थोडं कटू वास्तवदर्शी लिहिलं आहे.त्यामुळे प्रत्येकाच्याच पचनी पडेल असे नाही.पण आज त्याची गरज होती म्हणून हे शब्द मेंदूतून पाझरले.

*प्रा दिलीप आ जाधव*
*सचिव*
*कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना सांगली*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!