आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानसामाजिक
रामानंदनगर बुर्ली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयास आदर्श महाविद्यालय पुरस्कार कर्मवीर पारितोषिक विजेते ;मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे.के बापू जाधव यांची उपस्थिती

दर्पण न्यूज रामानंदनगर बुर्ली :-
सातारा येथे झालेल्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमा मध्ये रामानंदनगर येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयास आदर्श महाविद्यालय कर्मवीर पारितोषिक प्राप्त झाले .
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी ,सचिव विकास देशमुख यांच्या हस्ते महाविद्यालयास पुरस्कार मिळाला .
पुरस्कार वितरण वेळी रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे.के बापू जाधव ,प्राचार्य डॉ.यू .व्ही. पाटील व सहकारी प्राध्यापकांनी सातारा येथे मान्यवरांच्या हस्ते आदर्श महाविद्यालय कर्मवीर पारितोषिक स्वीकारले.