बस्तवडे येथे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- बस्तवडे ता.कागल येथील बुद्ध विहार मध्ये तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस बौद्ध समाजातील ज्येष्ठ उपासिका आयुष्यमती. सुशीला पांडुरंग कांबळे , माया मधुकर शिंदे, अनिता भिकाजी कांबळे, प्रमिला गणपती कांबळे , चंपाबाई बळीराम कांबळे यांच्या हस्ते फुले अर्पण करण्यात आली. तर उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांनी केले बुद्ध वंदना व पंचशील ग्रहण केले. यावेळी त्यांनी गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. व तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्मकार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. यावेळी मा.सैनिक एकनाथ कांबळे, पांडुरंग रामचंद्र कांबळे, दिलीप मारुती कांबळे, विनोद गणपती कांबळे, अमरसिंह अरुण माने, अवरिका कांबळे, क्रांती कांबळे, ईशानी कांबळे, गायत्री कांबळे, खुषी कांबळे, श्रेया कांबळे, पूर्वा कांबळे, रिया कांबळे, अक्षता कांबळे, आक्काताई कांबळे, दुर्वा कांबळे, प्रियांशी कांबळे, आराध्या कांबळे, शौर्य कांबळे, आदित्य कांबळे, पार्थ कांबळे, वेदांत कांबळे, विजय माने, आदर्श कांबळे, व प्रथमेश कांबळे इत्यादी हजर होते. यावेळी आज बुद्ध जयंती निमित्त लहान मुलांनी महापुरुषांच्या वतीने गीत सादर केले. तर अशा स्वयंसेविका सुनिता उत्तम कांबळे यांनी सर्वांना भाऊ वाटप केला. तर लहान मुलांनी बुद्धांच्या मूर्ती जवळ आकर्षक रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली होती.सर्वांचे आभार नम्रता कांबळे यांनी मांडले.व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.