पिंपळगांव बुद्रुक येथील समरजीत घाटगे गटातून अनेकांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):-कागल विधानसभा मतदारसंघातील पिंपळगांव बुद्रुक येथील समरजीत घाटगे गटातून श्री रमेश कांबळे, दीक्षा कांबळे, कुंडलिक कांबळे, सागर चांभार, रंजना कांबळे, यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला.
*श्री. रमेश कांबळे व त्यांच्यासोबत प्रवेश केलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून आम्ही चूक केली असं कदापिही वाटणार नाही. त्याचप्रमाणे त्यांचे जे जे काही विकास कामाचे काम असेल ते मी करून देईन असा विश्वास मंत्री श्री मुश्रीफ यांनी दिला.*
*यावेळी पक्ष प्रवेशावेळी बिद्री कारखान्याचे व्हा. चेअरमन मनोजभाऊ फराकटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष निलेश शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य रघुनाथ कुंभार, सरपंच बंडेराव सूर्यवंशी, अजित पाटील, गुंडा येरुडकर, धनाजी सूर्यवंशी, बाबुराव येरुडकर, विनायक माने, संजय चौगुले, सतीश सूर्यवंशी, इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.*