जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग कडून वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घ्यावा : सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे बस्तवडेकर

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग कडून वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे बस्तवडेकर यांनी केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे बस्तवडेकर यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती जमाती आणि या योजनेचा जवळपास 75 टक्के अनुदानावर लाभ घेता येतो. जिल्हा परिषद पशुसंवर्धन अंतर्गत तालुक्याच्या पशुसंवर्धन विभाग कडून या योजना राबविल्या जाणार आहेत. विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नव बौद्धांना दोन दुधाळ म्हैशींसाठी 1 लाख 34 हजार 433 रुपये तर दोन संकरित गायीसाठी 1 लाख 37 हजार 638 रुपये अनुदान आहे. तसेच दहा शेळ्या व एक बोकड गट वाटप साठी 77 हजार 659 दिले जाणार आहेत. तर जिल्हा वार्षिक योजना एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत 100 एक दिवशीय मिश्र कुक्कुट पक्षांचा गट वाटप करणे साठी 14 हजार 750 रुपये अनुदान मिळणार आहे. तरी या योजनेत महिलांसाठी 33 टक्के तर अपंग साठी 5 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. या सर्व योजनेच्या लाभासाठी 2 जून पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तरीही सदरची योजना 2025- 26 या वर्षात राबवली जाणार आहे. तरी या योजनेसाठी ऑनलाइन करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहेत. लाभार्थी आधार कार्ड, रेशन कार्ड, ई-मेल आयडी, रेशन कार्ड मधील व्यक्तींचे सर्वांचे आधार कार्ड, फोटो आयडेंटी साईज, सहीचा नमुना, व आपला मोबाईल नंबर. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील व विशेषता सर्व तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजना समिती कागल सदस्य सातापा पुंडलिक कांबळे बस्तवडेकर यांनी केले आहे.


