वड्डी गावच्या विकासासाठी माजी उपसरपंच राजू वजीर, विद्यमान सदस्यांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश : प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांची उपस्थिती
गट तट बाजूला ठेऊन गट नेते महेंद्र सिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली राजू वजीर एकत्र

दर्पण न्यूज मिरज :- वड्डी गावच्या विकासासाठी माजी उपसरपंच राजू वजीर आणि विद्यमान सदस्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला .गट तट बाजूला ठेऊन गट नेते महेंद्र सिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली राजू वजीर एकत्र आले आहेत. या पक्ष प्रवेशा वेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांची उपस्थिती होती.
वडी ग्रामपंचायत निवडणुकीतील गट तट बाजूला ठेवून गट नेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली माजी उपसरपंच राजू वजीर आणि विद्यमान सदस्यांनी जन स्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे ,
जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित (दादा) कदम यांच्या मार्गदर्शना खाली मिरज ग्रामीण भागात पक्ष बांधणी जोरदार सुरू असून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत वड्डी गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योगपती राजू (भाई) वजीर शेकडो कार्यकर्त्या सहित जनसुराज्य पक्षा मध्ये त्यांनी प्रवेश केला या वेळी उपस्थित ज्येष्ठ नेते महादेव (अण्णा) कुरणे महेंद्रसिंग शिंदे सरकार समीर भाई मालगावे जिल्हा प्रमुख अनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉ पंकज म्हेत्रे प्रविंणजी धेंडे जिल्हा संघटक सलीम पठाण मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर कल्लापा नाईक रमेश नाईक अभिजीत मगदूम व सर्व जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.