महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर ः अनिल पाटील
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात प्रकाश आबिटकर, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी सकाळी 8.00 वाजता छत्रपती शाहू स्टेडीयम, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व शहिद जवानांचे कुटुंब यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये. यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्लास्टिकचा राष्ट्रध्वजासाठी वापर होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.