ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक
किर्लोस्करवाडी परिसरात गोरोबा काका पुण्यतिथी साजरी
दर्पण न्यूज रामानंदनगर :- किर्लोस्करवाडी येथे गोरोबाकाका पुण्यतिथी साजरी झाली. यावेळी गोरोबा काकांना फुले वाहून अभिवादन करण्यात आले.
रामानंदनगर परिसरामध्ये देखील गोरोबाकाका पुण्यतिथी साजरी झाली.येथील दगडू शेठ कुंभार यांच्या घरी ज्ञानेश्वर मंदिर परिसरामध्ये दरवर्षी प्रमाणे संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी साजरी झाली, यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. टाळ चिपळ्यांच्या निनादात भजन व आरती झाली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले होते. नरसिंह सरस्वती भजनी मंडळाचे सर्वजण यावेळी उपस्थित होते.
महादेव कुंभार यांच्या घरीही, भजनाचे आयोजन करण्यात आले होते,टिमकी तसेच मृदंग याचाही वापर यावेळी करण्यात आला होता तल्लीन होऊन भजन करण्यात सर्व भाविक मग्न होते.