व्हान्नाळी येथे तानाजी कांबळे यांच्या घरी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) ;- व्हान्नाळी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे आयु.तानाजी तुकाराम कांबळे /आयु. जानकी तानाजी कांबळे, यांच्या घरी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली या कार्यक्रमासाठी बौद्ध संस्कार विधी आयुष्यमान विद्याधर देशमुख श्रामनेर बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने संस्कार विधी पार पडला ,सदर तथागतांची मूर्ती दान दातेआयुष्यमान डॉक्टर अनंत हर्षवर्धन, वाशी नवी मुंबई यांनी दान दिली ,सदर कार्यक्रमासाठी आयुष्यमान नागेश कांबळे समता सैनिक कागल, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सातापा कांबळे, बस्तवडे ,एम एस कांबळे सर सावर्डे बुद्रुक, व इतर समाजातील पुरुष महिला मोठ्या प्रमाणामध्येउपस्तीत होती, तथागतांची मूर्ती गल्लीतून मिरवणूक काढीत फुलांची उधळण करीत तानाजी कांबळे यांच्या घरी प्रतिष्ठापना करण्यात आली मान्यवर विद्याधर देशमुख, सातापा कांबळे, एम एस सर ,नागेश कांबळे ,यांनी आपले मनोगत पर शुभेच्छा दिल्या, आभार तानाजी कांबळे यांनी मानले ,सरणतंय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली /सिद्धी तानाजी कांबळे /सिद्धांत तानाजी कांबळे /सुभाष तुकाराम कांबळे /शुभांगी सुभाष कांबळे/ सानिका सुभाष कांबळे/ अनिरुद्ध सुभाष कांबळे /बेबीताई तुकाराम कांबळे अनेक बौद्ध बंधू उपस्थित होते,