वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल बोळावी ग्रामस्थांच्यावतीने हसन मुश्रीफ यांचा जाहीर नागरी सत्कार






दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- बोळावी, ता.कागल येथे कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र व राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल बोळावी ग्रामस्थांच्यावतीने नामदार हसनसो मुश्रीफसाहेब यांचा जाहीर नागरी सत्कार व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.
*यावेळी माजी आमदार संजयबाबा घाडगे, पंचायत समितीची माजी सदस्य शशिकांत खोत, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सूर्याजी घोरपडे, ज्योती मुसळे, दिग्विजयसिंह पाटील, सरपंच सागर माने, उपसरपंच आनंदा पाटील, रामदास पसारे, दयानंद कणसे, अर्चना पाटील, शोभा कावळे, आनंदा साळुंखे, दीपक पाटील, विनायक तोरसे, सुभाष गडकरी, पुंडलिक वास्कर, बाबुराव भोसले, पुरुषोत्तम साळुंखे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


