आगामी काळात मोठा धमाका पाहिला मिळेल : जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम
मिरज ग्रामीण भागात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भगदाड ; महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सह ग्रामपंचायत आजी माजी सदस्य , विकास सोसायटीचे संचालक यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश

दर्पण न्यूज मिरज :- मिरज ग्रामीण भागात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भगदाड ,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सह ग्रामपंचायत आजी माजी सदस्य , विकास सोसायटीचे संचालक यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. आगामी काळात मोठा धमाका पाहिला मिळेल, अशी माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी दिली.
मिरज तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला खंभिर नेतृत्व नसल्याने नाराजी व्यक्त करीत वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकून आज जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत , जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीर दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची जोरदार मोट बांधणी सुरू असून
करोली एम आणि भोसे ,गावातील राष्ट्रवादी शरद पवार गट माजी पंचायत समिती सदस्य जिल्हा उपअध्यक्षा अनिता ताई कदम, ग्रामपंचायत सदस्य उज्वलाताई पवार ,भोसे विकास सोसायटी विद्यमान व्हाईस चेअरमन संगीता ताई खोत , करोली माजी सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई पाटील करोली एम ग्रामपंचायत विद्यमान सदस्य शशिकांत माळी गुलाबराव पाटील शिवसेना उप शहर प्रमुख सादिक पठाण आतिक सौदागर तोफिक शिपाई समीर पठाण शारुख पठाण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जन सुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला यावेळी महादेव अण्णा कुरणे जिल्हा अध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष पंकज म्हेत्रे प्रवीण धेंडे अमर दादा पाटील अरविंद पाटील जयशिंग तात्या चव्हाण सलीम पठाण बंडू रुईकर सुशील माळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट हा नेत्यांच्या पै पाहुणे आणि चेल्या चपाट्यांना न्याय देणारा पक्ष असल्याचा आरोप अरविंद पाटील यांनी केला तर येत्या काळामध्ये मोठा धमाका पाहायला मिळेल असे सूचक वक्तव्य समित दादा कदम यांनी केले आहे.