मुरगुड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मुरगुड येथील विविध ठिकाणी उत्साहात साजरी झाली.
यावेळी पोलीस स्टेशनमध्ये माननीय शिवाजीराव करे साहेब व अनिल सिद्धेश्वर यांच्या प्रमुख उपस्थित सर्व स्टाफ ने साजरी केली तसेच मुरगूड मध्ये शिवतीर्थ छत्रपती शिवाजी राजे पुतळ्यासमोरील बाबासाहेबांचे तैलचित्रास मानवंदना शिवभक्त सर्जेराव भाट ओमकार पोद्दार अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर अनिल सिद्धेश्वर एकनाथ देशमुख दत्तात्रय मंडले जयसिंग भोसले प्रशांत सिद्धेश्वर अन्य मान्यवरांच्या उपस्थित साजरी करण्यात आले तसेच हुतात्मा तुकाराम वाचनालय येथे सर्व वाचकांनी व ग्रामस्थांनी जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमापूजन माजी नगरसेवक अनिल इराप्पा कांबळे तसेच स्वागत व प्रस्ताविक नगरसेवक मारुती कांबळे यांनी केले यावेळी अविनाश चौगुले सर यांनी बाबासाहेबांच्या बद्दल सविस्तर मनोगत व्यक्त केले यावेळी माजी नगरसेवक दिलीप कांबळे डॉक्टर अनिल सिद्धेश्वर एकनाथ देशमुख जयसिंग भोसले संजय घोडके विशाल भोपळे अन्य मान्यवर उपस्थित होते.