साके येथील कै सौ सुभद्रामाता आशीर्वाद माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिकण्याचा व संघटित होण्याचा संकल्प करूया : दत्तात्रय ससे

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):-साके तालुका कागल येथील कै सौ सुभद्रामाता आशीर्वाद माध्यमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बोलताना मुख्याध्यापक दत्तात्रय ससे म्हणाले , डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणणे अतिशय गरजेचे असून नवीन ज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी संघटित होण्याचा तसेच न्याय समता स्वातंत्र्य बंधुत्व आदी मुल्यांचा पाईक होण्याचा प्रयत्न करावेत. बाबासाहेबांचे विचार डोळ्यासमोर ठेवून यशाचे शिखर गाठावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती शाळेचे माजी विद्यार्थी राहुल पाटील विक्रम चौगले एम डी कांबळे नागेश गिरी बाजीराव पाटील यशवंत वाईंगडे शिवाजी निऊंगरे होते यावेळी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन माजी विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच माजी विद्यार्थी तानाजी हरेल यांनी शाळेला बाबासाहेबांच्या जीवनावरील ग्रंथ भेट दिली बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दत्तात्रय ससे तर टी व्ही पाटील पी एच पाटील व्हि टी किल्लेदार मॅडम यांची भाषणे झाली प्रस्ताविक व सूत्रसंचालन एस व्ही पाटील मॅडम यांनी केले तर आभार सिद्धेश ससे यांनी मानले कार्यक्रमास टी एस सामंत बाळासो पोवार अरुण पाटील रमेश पाटील जनार्दन सातुशे आदी मान्यवर उपस्थित होते.