महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विद्या मंदिर नंद्याळ शाळेत विविध उपक्रमांनी साजरी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती विद्या मंदिर नंद्याळ शाळेत विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त सरपंच सौ. मनिषा कांबळे व सर्व शिक्षक,शालेय कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पंचशील तरूण मंडळाचे कार्यकर्ते व विद्यार्थी यांच्या उपस्थित करण्यात आले.
जयंतीनिमित्त शाळेत वकृत्व, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, स्मृर्ती चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्याना खाऊ वाटपही करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच विविध मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासाठी राजू शिंदे अध्यक्ष शालेय कमिटी प्रदीप करडे सर,अविनाश गौड,राहुल फगरे, हिरामणी कांबळे सर,आनंद कांबळे,शशिकांत कांबळे,संजय कांबळे,अजय कांबळे,अभिजीत कांबळे व पंचशिल तरुण मंडळाच्या सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.