महाराष्ट्रसामाजिक
कर्मवीर.डी.आर.भोसले वि.म. बस्तवडे यांच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- कर्मवीर.डी.आर.भोसले वि.म. बस्तवडे यांच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करणेत आली. यावेळी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंदा माळी सर यांनी केले.तर प्रतिमा पूजन माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.तर यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
तर सुहास कांबळे सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील 20 विद्यार्थ्यांनाही बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भाषणं केली. यावेळी आभार सौ.चव्हाण मॅडम यांनी मानले.