महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी वेळेत जात पडताळणी करावी : सविता पाटील

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने समता पंधरवडा आयोजन

 

दर्पण न्यूज सांगली  :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या मार्फत राज्यातील इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखा तसेच अभियांत्रिकी द्वितीय व तृतीय विद्यार्थी यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने समता पंधरवडा आयोजित केला असून या विशेष मोहिमाचा लाभ घ्यावा
दि. ०१ एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत समता पंधरवडा निमित्त जात वैधता प्रमाणपत्राबाबत कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान होण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन केले गेले
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला सामाजिक न्याय देण्यासाठी व मागासवर्गीय कल्याणाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे घेण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते सर्व गरजू विद्यार्थ्यांनी जात पडताळणी सुलभपणे करून घेण्यासाठी शिबिरात जात पडताळणी विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले जात पडताळणी प्रक्रिया याविषयी जातपताळणी कार्यालीन सहाय्यक अजित माने व समतादूत सविता पाटील यांनी आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मागासवर्गीय विद्यार्थांना या प्रमाणपत्राच्या गरजे विषयी जागृत करून, कोणीही मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहु नयेत म्हणून अशा शिबिरांचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत दिलेली माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याचेही आवाहन केले.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांचे शंकांचे निरसण करण्यात आले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक समतादूत सविता पाटील यांनी केले कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य एस बी पाटील ,श्री एस बी देसाई वरिष्ठ लिपिक, तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षाअप्पर जिल्हाधिकारी श्रीमती प्रतिभा इंगळे, उपायुक्त तथा जातपडताळणी समिती सदस्य नागनाथ चौगुले, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते, प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .टी. जी. धनके यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रा श्री एस. ए.मलमे यांनी केले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!