महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञान

अरे भाऊ..! जरा वारा आला, जरा वीज चमकली..! लाईट गेली ? ; लोकं हैराण झाली, कासावीस झाली..! तू का म्हणून पाठ फिरवली भाऊ?

उकाडा वाढला..! महिलांच अन् शेतकऱ्यांचं नियोजन खोळांबल..! नुसतंच बील असं कारं भाऊ आलं..!

 

 

दर्पण न्यूज भिलवडी :- (अभिजीत रांजणे)

 भिलवडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने अरे भाऊ..! जरा वारा आला, जरा वीज चमकली..! लाईट गेली ? लोकं हैराण झाली, कासावीस झाली..! तू. का म्हणून पाठ फिरवली भाऊ? असं का हो भाऊ ?  उकाडा वाढला..! महिलांच अन् शेतकऱ्यांचं नियोजन खोळांबल..! नुसतंच बील आमच्या माथ्यावर असं कारं भाऊ..!,  असं  भिलवडी परिसरातील महिला अन् लोक म्हणत आहे रे भाऊ..!

 भिलवडी परिसरात जरा वाराला,  जरा वीज चमकली की महावितरणचे काही महाशय वीज घालवण्याचा प्रकार करतात की भाऊ. तर त्याला अपवादही असेल की रे भाऊ..! काही ठिकाणी शॉर्टसर्किट अथवा विजेच्या तारेवर झाडाच्या फांद्याही पडल्यास वीज कट करावे लागते रे भाऊ. परंतु  महावितरणच्या काही महाशयांनी  त्यांच्या खाजगी कामासाठी दहावी,  बारावीच्या परीक्षा असतानाही वीज कट करण्याचा प्रकारही केला,पण तूच सांग हे योग्य आहे का रे भाऊ..!

जरा वारा आला,  जरा वीज चमकली तर लगेचच वीज घालवण्याचा प्रकार योग्य आहे का रे भाऊ? असं होत असेल तर आपलं महावितरणच कुठेतरी कमी पडते की रे भाऊ?  भर उन्हाळा सुरू आहे रे भाऊ..! महिलांच अन् शेतकऱ्यांचं नियोजन खोळांबतय की रे भाऊ..!

प्रत्येक महिन्याचं महिन्याला वीज बिल कसं आदमीने आणि  वेळेवर पाठवतोयस,  देतोयस रे भाऊ..! अजून भर मे महिना अन् उकाडाही वाढणार आहे रे भाऊ..! शेतकऱ्यांचे पीकही असणार आहे, याचा विचार करूनच जरा जास्तचं नियोजन कर रे भाऊ.‌‌..! अशा विनंत्याही लोकांतून होत आहे रे भाऊ..!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!