सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे वाचनालयाचे ग्रंथपाल वामन काटेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार

दर्पण न्यूज भिलवडी :-
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे वाचनालयातील सेवानिवृत्त ग्रंथपाल वामन काटेकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल एक मार्च 2025 रोजी वाचनालयाच्या अभ्यासिका हॉलमध्ये स पत्नीक सत्कार करण्यात आला .
वाचनालयाचे संचालक व उद्योगपती मकरंद चितळे यांचे हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न झाला प्रारंभीन वाचनालयाचे कार्यवाहक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले आणि वामन काटेकर यांच्या 35 वर्षे ग्रंथपाल सेवेचा आढावा घेतला.यावेळी शाल दासबोध ग्रंथ व पाच हजार रुपयांचा धनादेश वामन काटिकर यांना मकरंद चितळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला तसेच वाचनालयाच्या ग्रंथपाल मयुरी नलवडे प्रमुख लेखनिक विद्या निकम आणि प्राजक्ता कुलकर्णी यांचे हस्ते सौ. काटेकर यांचा साडी चोळी भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जयंत केळकर प्रमोद कुलकर्णी डी आर कदम भु. ना. मगदूम सुभाष कवडे यांनी मनोगत व्यक्त केले.मकरंद चितळे यांनीही वामन काटिकर यांचा आज वरच्या सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख करून उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या समारंभास विश्वस्त जी जी पाटील उपाध्यक्ष डी आर कदम संचालक भू. ना. मगदूम जयंत केळकर महादेव जोशी रमेश पाटील बाळासाहेब पाटील संजय पाटील सर जयदीप पाटील यांच्यासह रमेश चोपडे सर आधी मान्यवर वाचक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .हणमंत डिसले यांनी आभार मानले समारंभाचे संयोजन कार्यवाह सुभाष कवडे मयुरी नलवडे विद्या निकम माधव काटिकर यांनी केले. तसेच यावेळी मकरंद चितळे महावीर चौगुले भूपाल मगदूम रमेश चोपडे डी. आर. कदम यांचा ग्रंथ भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.