डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे शासकीय सेवेत घवघवीत यश

सांगली : सामाजिक न्याय विभागाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्याचा लाभ घेऊन अनेकांनी आपले जीवनमान उंचावले आहे. याची प्रचिती मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत घवघवगीत यश मिळवल्यामुळे ठळक झाले आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कडेगाव येथील आठ विद्यार्थ्यांनी व विटा येथील दोन विद्यार्थ्यांनी सन 2024-25 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बॅकिंग स्पर्धा परीक्षा व इतर सरळसेवा परीक्षामधून शासकीय सेवेमध्ये यश संपादन केले.
सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कडेगाव येथील विद्यार्थी सुशांत गावडे यांनी कृषी अधिकारी (बँक ऑफ इंडिया), विशाल शिंदे यांनी कृषी विस्तार अधिकारी (सिंधुदुर्ग), शिवप्रसाद गुरव यांनी मंत्रालय सहाय्यक, स्वप्नील कोकरे यांनी मुंबई पोलीस, अजिंक्य आढारी यांनी कृषी अधिकारी (कॅनरा बँक), अतुल सावंत यांनी मंत्रालय सहाय्यक, सुशांत पवार यांनी कर सहाय्यक व महसूल सहाय्यक तर विकास गेजगे यांनी ग्रामविकास अधिकारी म्हणून सन 2024-25 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग स्पर्धा परीक्षा व इतर सरळसेवा परिक्षेमध्ये यश संपादन केले. आतापर्यंत या वसतिगृहातील एकूण 18 विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत यश संपादन केले आहे. यामध्ये केंद्रीय पोलीस उपनिरीक्षक-01. भारतीय सैन्य दल- 5 मुंबई पोलीस – 02, बैंकिंग सेवा -2, महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यात -08 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह विटा येथील विद्यार्थी कार्तिक कांबळे याने भारतीय सैन्य दलात तर रोहन ऐवळे याने मुंबई पोलीस दलात सन 2024-25 मध्ये शासकीय सेवेत यश संपादन केले. आत्तापर्यंत या वसतिगृहातील एकूण 6 विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत यश संपादन केले आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक-01, भारतीय सैन्य दल-2, मुंबई पोलीस 01 व महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यात 02 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समाजकल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी अभिनंदन केले.