महालक्ष्मी न्यूज 24 या न्यूज चैनलच्या संपादिका प्रतिभा शेलार यांची वाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेत महाराष्ट्र राज्याच्या महिला कार्याध्यक्षापदी निवड

कोल्हापूर – अनिल पाटील
वाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या कार्याध्यक्षपदी साताऱ्यातील महालक्ष्मी न्यूज २४ च्या संपादिका प्रतिभा शेलार यांची निवड करण्यात आली. पत्रकारितेत महिलांचा सहभाग वाढवणे महिला पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी पाठपुरावा करून सोडविणे यांचे हक्क यासाठी संघटना कौशल्य प्रणाला लावून कामकाज करणे या ध्येय धोरणावर व्हाईस ऑफ मीडियाची महिला प्रदेश कार्यरत आहे. 13 फेब्रुवारी रोजी संघटनेच्या पत्रकार महिलांची निवडणूक झाली त्या निवडणुकीत उमेदवार म्हणून पाच महिला उभ्या होत्या त्या निवडणुकीत प्रतिभा शेलार यांना पसंतीचे मत मिळाले आहे त्या अनुषंगाने प्रतिभा शेलार यांना वाईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा शहर तालुके येथे महिला पत्रकार असतील त्यांनी वाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेमध्ये सभासद व्हावी आणि महिला पत्रकारांची संघटना वाढवावी तसेच महिला पत्रकारांना सुरक्षितता व सुव्यवस्था मिळवून देण्याचे संघटना हमी देतो तसेच पत्रकार महिला यांना या क्षेत्रामध्ये रुची असतील त्यांनी या पत्रकार संघटनेमध्ये वर पत्रकार क्षेत्रात उतरून आपले कौशल्य दाखवावे तसेच पत्रकार महिला यांच्या अडचणी संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रतिभा शिलार यांना ( फोन नंबर 9309874110 ) निसंकोचपणे सांगावे जेणेकरून संघटनेतील त्यांच्या अडचणी दूर करण्यात येतील.