पी.एस. घाटगे यांचा महासंघात जाहीर प्रवेश

कोल्हापूर ः अनिल पाटील
नागोजीराव पाटणकर विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ते परशराम घाटगे तथा पी.एस.घाटगे यांनी आज महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघामध्ये जाहीर प्रवेश केला. प्रवेश कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महासंघाचे राज्य सल्लागार एम.डी.पाटील होते.
” खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैयक्तिक व सामुदायिक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडविले जातात…. म्हणून यापुढे महासंघाच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे ” पी.एस.घाटगे यांनी बोलताना स्पष्ट केले.
महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष व विद्यापीठ शिक्षण संस्थेचे प्रशासनाधिकारी प्रदीप मगदूम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ,कोल्हापुरी फेटा देऊन पी.एस. घाटगे यांचा प्रवेश पर सत्कार करण्यात आला.
यावेळी पी एस घाटगे यांची महासंघाच्या राज्य प्रवक्ता पदी निवड करण्यात आल्याची घोषणा महासंघाचे राज्याचे अध्यक्ष राजेंद्र निकम व मुख्य सचिव विठ्ठल उरमुरे यांनी केली.
कार्यक्रम प्रसंगी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष टी.आर.पाटील दस्तगीर मुजावर शहराध्यक्ष संतोष पाटील, सागर जाधव, रवींद्र नाईक, धीरज पारधी, अभिजीत साळोखे, संतोष कुंभार, गौतम कांबळे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष टी.आर.पाटील यांनी केले. तर करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दशरथ कुंभार यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले.