बिद्री कारखाना निवडणुकीत भाजप’चे नेते देवराज बारदेसकर गट खासदार धनंजय महाङीक यांच्या नेतूत्वाखालील श्री. राजेश्री शाहू परिवर्तन आघाङीला उद्या पाठिंबा देणार

कोल्हापूरः अनिल पाटील
सध्या बिद्री साखर कारखान्याची निवडणूक ही प्रचंड इर्षेने सूरु असून सत्ताधारी व विरोधी आघाडी मध्ये काटाजोड लढत असलेचे चित्र पहावयास मिळत आहे. उमेदवारी प्रक्रिया अंतिम होत असताना विरोधी आघाडीकडून भुदरगड मधील भाजप ‘चे युवा नेते देवराज बारदेसकर गटाला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु बेरजेच्या राजकारणामध्ये याही वेळेला बारदेसकर गटाला वंचित राहावे लागल्याने कार्यकर्ते नाराज होते. दरम्यान याबाबत देवराज बारदेसकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता आपण दक्षिण भारतात असून आज रात्री कोल्हापूरात दाखल होणार आहे. उद्या माझ्या गटाच्या कार्यकत्यांची बैठक घेवून खासदार धनंजय महाङीक यांच्या सोबत मी राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान बिद्रीच्या राजकारणात व भविष्यातील राजकारणात बारदेसकर गटाची ताकत पाहता त्यांना आपल्या गोटात घेणेसाठी सत्ताधारी व विरोधी आघाडीकडून सतत संपर्क साधला जात आहे.