भिलवडी व्यापारी एकता असोसिएशनची कौतुकास्पद कामगिरी; सेकंडरी स्कूल भिलवडी येथे वह्यावाटप
विद्यार्थ्यांमध्ये समाधान ; अनेक वर्षांपासून व्यापारी एकता असोसिएशन भिलवडीची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा

दर्पण न्यूज भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने सेकंडरी स्कूल भिलवडी या ठिकाणी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्रच चर्चा सुरू आहे.
गेल्या चार वर्षापासून व्यापारी एकता असोसिएशन भिलवडी आणि परिसरामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. व्यापारी एकताच्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा करताना कुठलाही केक न कापता एकमेकांना फळे देऊन आरोग्यदायी वाढदिवस साजरा केला जातो.
येथील चॅलेंजर्स ग्रुपच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. व्यापारी एकता असोसिएशनने ही परंपरा जपताना त्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस केला. गतवर्षी आष्टा येथील वृद्धाश्रमामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्यात आली. यावर्षी पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस शाळेमध्ये शिकणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या देऊन करण्याचं निश्चित केलं होतं.
आज सेकंडरी स्कूल भिलवडी या ठिकाणी जाऊन गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी स्वागत केलं. व्यापारी एकता चे संचालक सचिन पाटील यांनी व्यापारी एकता असोसिएशन राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
मुख्याध्यापक संजय मोरे यांनी आभार मानताना आज मुलांच्या अतिरिक्त मोबाईल वापरावर डिजिटल डिटॉक्स सारखा उपक्रम राबवावा अशी इच्छा व्यक्त केली.