महाराष्ट्रसामाजिक

टाकळीभानच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

 

दर्पण न्यूज टाकळीभान: रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालया मध्ये महाराष्ट्रातील थोर साहित्यिक, विचारवंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम . शिंदे , पर्यवेक्षक एस.एस . जरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक एन . आर. पिदुरकर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर . एम .शिंदे , पर्यवेक्षक एस .एस . जरे , कार्यक्रमाचे अध्यक्ष एन आर . पिदुरकर ,प्रमुख वक्त्या श्रीमती यु .डी . सुतार , संदिप जावळे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एन . आर. पिदुरकर म्हणाले की , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श आजच्या विद्यार्थांनी समोर ठेवला पाहिजे . जीवनामध्ये चांगल्या सवयी लावल्या पाहिजे .कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती यु . डी. सुतार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील विविध उदाहरणे व दाखले देऊन त्यांनी केलेले कार्य आजच्या विद्यार्थ्यांनी पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले . यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु राजश्री शेरकर , कु . दिव्यानी विघे , कु श्रावणी थोरात यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु . मुस्कान सय्यद,सूत्रसंचालन कु . परिनिती बोडखे तर आभार कु . किंजल गायकवाड यांनी व्यक्त केले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!