आरोग्य व शिक्षणसामाजिक
कोल्हापूरात आद्य’ शक्ती जन फौंङेशन ट्रस्टच्या वतीने”जागतिक योग दिन साजरा

कोल्हापूरः अनिल पाटील
जागतिक योग दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक योग दिन आद्य शक्ती जन फाउंडेशन ट्रस्ट तर्फे दि मॉडर्न स्कूल येथे साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्ष अॅङ. संगीता तांबे यांनी जागतिक योग दिन याबद्दल माहिती सांगितली. तसेच सर्वप्रथम योग दिन केव्हा साजरा करण्यात आला याबद्दलची माहिती मुलांना दिली योगामुळे आपल्याला काय फायदे होतात याची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर योगाचे वेगवेगळे प्रकार घेऊन मुलांना योगा पासून काय फायदे आहेत याची माहिती दिली .
यावेळी आद्य शक्ती जन फाउंडेशन ट्रस्ट तर्फे पदाधिकारी अशोक लोहार”” अॅङ संजय गायकवाड” श्वेता तांबे”” दत्ताञय कुंभार उपस्थित होते.
कार्यक्रमास दि मॉडर्न स्कूल’च्या मूख्याध्यापिका सौ गिरिजा जोशी कांबळे ” सौ.काशीद. सौ. सुतार उपस्थित होत्या