केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले आई तुळजा भवानी मातेचे दर्शन

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे)
तुळजापूर :- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री तसेच आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) असणारे शिवसेनेची बुलंदतोफ मा.ना.श्री प्रतापराव जाधव साहेब यांनी काल दि.१८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९:३० वाजता श्री तुळजा भवानी मातेला आपला कुलधर्म कुलाचार करून दर्शन घेतले.*
*सन १९९५,१९९९ व २००४ साली मेहकर विधानसभेचे ते सदस्य राहिलेले आहेत.*
*१९९७ ते ९९ या काळात क्रिडा,युवक कल्याण, व*
*सिंचन राज्यमंत्री पदावरती कार्य केलेले आहे.तसेच* *२००९,२०१४,२०१९ व २०२४ सलग चार वेळा बुलढाणा लोकसभेवरती निवडून आलेले आहेत.*
*यावेळी श्री तुळजा भवानी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी होवू घातलेल्या मंदिर विकास आराखडा*
*बाबत मंदिर प्रशासनाकडून माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
*यावेळी तुळजापूर शहर* *शिवसेनेकडून त्यांना कवड्याची माळ घालून देविची प्रतिमा देण्यात आली. याप्रसंगी धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम परमेश्वर, शिवसेना शहरप्रमुख बापुसाहेब भोसले, शिवसैनिक अमोल जाधव, गणेश छत्रे आदी शिवसैनिक हजर होते.