महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल दादा राऊत यांचा सांगली जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस चा दौरा

पलूस प्रतिनिधी:- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेच्या पदाधिकाऱ्यांची सांगली जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचा दौरा गुरुवार दि २४ ऑगस्ट प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू चिब तसेच सह प्रभारी एहसान अहमद खान तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कुणाल दादा राऊत, उपाध्यक्ष शिवराज दादा मोरे, महाराष्ट्र युवक काँग्रेस चे प्रवक्ते दीपक राठोड, हे कोल्हापूर वरून दुपारी २ नंतर आष्टा येथे त्यांचे काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करणार, त्यानंतर अंकलखोप येथे पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात येईल व त्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून औदुंबर येथील श्री दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन पुणदी तर्फे वाळवा या ठिकाणी माझी गाव माझी शाखेचे उदघाटन करून दुधोंडी येथे मानसिंग को ऑप बँकेला भेट देऊन कुंडल येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे, तसेच कुंडल मार्गे देवराष्ट्रे येथे स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोहननगर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. डॉ पतंगरावजी कदम (साहेब) यांच्या समाधीचे दर्शन घेऊन येवलेवाडी येथे माझी गाव माझी शाखेचे उदघाटन होणार आहे, अशा पद्धतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व प्रदेश पदाधिकारी यांचा दौरा राहणार आहे, या दौऱ्याचे सर्व नियोजन आमदार डॉ विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, सांगली जिल्ह्याचे नेते जितेश भैय्या कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा होणार आहे सर्व युवक ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने अंकलखोप येथे उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सुधीर भैय्या जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.*