महाराष्ट्रराजकीयसामाजिक
मिरज येथे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीस मंजुरी मिळावी ; जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम
जनसुराज युवा शक्तीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

दर्पण न्यूज मिरज : – सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील मिरज येथे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या शासकीय दूध डेअरीच्या जागेमध्ये शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणेसाठी मंजुरी मिळावी, असे निवेदन जनसुराज युवा शक्तीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला.