कोल्हापूर येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली 14 रोजी विविध विषयांच्या आढावा बैठका

दर्पण न्यूज कोल्हापूर : – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी व अधीनस्थ कार्यालयांचा शासनाच्या (फ्लॅगशिप) कार्यक्रम व इतर अनुषंगिक महत्वाच्या विषयांच्या आढावा बैठका शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 4.30 वाजता जिल्हाधिकारी, कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
यामध्ये दुपारी 12 ते 3 वाजता नैसर्गिक आपत्ती विषयक पंचनामा व अनुदान वाटप, संजय गांधी निराधार/ श्रावणबाळ वृध्द अनुदान योजना, रोजगार हमी योजना अंतर्गत संनियंत्रण व विविध कामे, ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी, उत्पन्न दाखला व अधिवास दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलिअर इत्यादी दाखल्यांचे वाटप, पुरवठा शाखा (प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजना अंतर्गत स्वस्त धान्य वाटप, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थींचे ई केवायसी, रास्तभाव दुकानांची तपासणी व त्यांच्यावरील कारवाई, नवीन गोदाम बांधकामाचे प्रस्ताव, गोदाम तपासणी व उद्दिष्टये पुर्तता/ आढळून आलेले दोष इ. कामकाजाचा आढावा), जिल्ह्यातील पुनर्वसन विषयक महत्वाच्या विषयांचा आढावा, जिल्ह्यात सुरु असलेले महत्वाचे संपादन प्रकल्प आढावा, जिल्ह्यातील सातबारा व प्रलंबित फेरफारांबाबत आढावा, स्वामित्व विकास योजना, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे कामकाज, आरटीएस अपिल प्रकरणांचा निपटारा या विषयांच्या बैठका होणार आहेत.
दुपारी 3.30 ते 4.30 वाजता सहायक आयुक्त, समाज कल्याण व सहायक संचालक (इमाव) अंतर्गत सुरु असलेल्या योजना व कामकाजाचा आढावा बैठक होणार असून यामध्ये घरकूल योजनांचा आढावा (रमाई आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना), केंद्र व राज्यस्तरीय योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा विकास, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, शासकीय वसतिगृह आढावा, शिष्यवृत्ती योजनांचा आढावा, कन्यादान योजना, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, प्रशिक्षण योजना, अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे, अनुसूचित जातीच्या औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्याची योजना व स्वाधार योजना या विषयांच्या आढावा बैठका होणार आहेत.