देश विदेशमहाराष्ट्र

जेएनयु’मधील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा अध्यासनासाठी भरीव निधी : मराठी भाषा मंत्री उदय सामंत

 

दर्पण न्यूज नवी दिल्ली  :- जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा अध्यासनासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेलअसे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री. सामंत यांनी जेएनयु विद्यापीठात भेट दिलीजवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरु डॉशांतिश्री पंडित आणि  छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी स्टेटस चेअरपर्सन तथा डीन प्रोफेसर अमिताभ मट्टू यांच्याशी या अध्यासनाबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती श्री सामंत यांनी दिली.

या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनासाठी दोन कोटी रुपये देण्यात येतीलतरपुढच्या आर्थिक वर्षात सात कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितलेमराठी भाषा अध्यासनासाठी यापूर्वी आर्थिक तरतूद करण्यात आली असून यापुढेही आर्थिक तरतूद करण्यात येईलतसेच या दोन्ही अध्यासनासाठी महाराष्ट्र शासनाकडून इमारत बांधण्यात येणार असल्याचेही श्री. सामंत यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. या निधी मधील काही भाग हा ‘जेएनयु’ येथील मराठी भाषा अध्यासनासाठीही वापरला जाईलजेएनयु च्या परिसरात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जे जे स्कूल ऑफ आर्ट्स तर्फे बांधण्याचा मानस असून जेएनयु कडून परवानगी मिळाल्यानंतर पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

दिल्लीत विविध अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रातले विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी वसतीगृहाची सुविधा उपलब्ध व्हावी दिल्लीतील मराठी शाळांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी दिली.

‘जेएनयु’मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनामधील अभ्यासक्रम याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आलीया अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. अरविंद येलेरी आणि समन्वयक डॉ. जे. जगन्नाथन यांनी अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.  प्राध्यापक डॉ.मनीष दाभाडेडॉराजेश खरातसरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होतेयावेळी विद्यापीठाच्या समन्वयकाकडून छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाच्या माध्यमातून महाराजांचे प्रशासनपरराष्ट्रीय धोरणव्यापार धोरण याबाबत माहिती देण्यात येईलअसे सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!