पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.23 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. सकाळी 5.40 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता माजी नगरसेवक धनपाल खोत यांच्या घरी सदिच्छा भेट, स्थळ – उल्हासनगर बस स्टॉप जवळ, कुपवाड. सकाळी 10.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे अँटी ड्रग्ज मोहिम कामी नियुक्त टास्क फोर्स बैठक. सकाळी 11.45 ते दुपारी 1.45 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली कामकाज आढावा बैठक. दुपारी 3.15 वाजता न्यु प्राईड मल्टीप्लेक्स आरडी, व्यंकटेश नगर सांगली येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग व व्यापार परिषद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता गर्व्हमेंट कॉलनी, विश्रामबाग सांगली येथे शेखर इनामदार यांच्या घरी सदिच्छा भेट. सायंकाळी 6 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, हरभट रोड, सांगली येथे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या जिपोत्सव-2025 या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6.40 वाजता कृष्णामाई मंदिर सरकारी घाट सांगली येथे कृष्णामाई महोत्सव 2025 येथे भेट. सायंकाळी 7.30 वाजता नदीवेस मिरज येथे विक्रम पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण, आगमन व राखीव. रात्री 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून मिरज रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9.50 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.