महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञान
डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी 10 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली : ई.सी.एच.एस. पॉलिक्लिनिक सांगली येथे 12 हजार रूपये प्रतिमाह इतक्या एकत्रित मानधनावर एक डेटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करावयाचा आहे. या पदाकरिता उमेदवार पाच वर्षाच्या अनुभवासह किमान पदवीधर अथवा सशस्त्र दलातील वर्ग 1 लिपीक असावा. इच्छुक उमेदवारांनी 10 मे 2023 पर्यंत अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह OIC ई.सी.एच.एस. पॉलिक्लिनिक सांगली यांच्याकडे miraj@echs.gov.in या मेल आयडीवर अथवा व्यक्तीश: सादर करावेत, अधिक माहितीसाठी 0233-2671767 0233-2950167 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.