महाराष्ट्रराजकीयसामाजिक

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा

 

कोल्हापूर,ः: अनिल पाटील

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.*

शनिवार दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळी 9 ते 10.30 वाजता गारगोटी ता. भुदरगड येथील निवास स्थानी अभ्यागताच्या भेटीसाठी राखीव.

सकाळी 10.30 वाजता गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने रविराज कॉम्प्लेक्स दुसरा मजला डॉ. माने व डॉ. चव्हाण हॉस्पिटल एस. टी. स्टॅण्ड जवळ गारगोटी कडे प्रयाण.

सकाळी 10.40 वाजता रविराज कॉम्प्लेक्स दुसरा मजला डॉ. माने व डॉ. चव्हाण हॉस्पिटल एस. टी. स्टॅण्ड जवळ गारगोटी येथे आगमन व श्री साई ब्लड बँक (रक्त केंद्र) कागल, राधानगरी आणि आजरा तालुक्यातील पहिली ब्लड बँक श्री. साई ब्लड सेंटर गारगोटी उदघाटन शुभारंभ व रक्तदान शिबीर सोहळ्यास उपस्थिती.

सकाळी 11.30 वाजता लोटस हॉल, छत्रपती शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे आगमन व एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक मेळावा कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आगमन व राखीव.

दुपारी 1.30 वाजता जिल्हा खणीकर्म कार्यालय, कोल्हापूर (गौण खनिज ) व सहजिल्हा निबंधक मुद्रांक, कोल्हापूर कडील बैठकास उपस्थिती ( स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर).

सोईनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

सोईनुसार गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!