विटा येथील नेताजी सुभाष चंद्र बोस ॲकडमीचा वर्धापन दिन उत्साहात

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी :-(शिराज शिकलगार) :
सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा खानापूर रोडलागत सामान्य सह सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना घेत त्यांची विचारधारा जपत शून्यातून विश्व निर्माण करून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन अशी लोकप्रियता कमी कालावधीत भरपूर नावारूपात आलेली नेताजी सुभाषचंद्र बोस ॲकडमीचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून खानापूर विटा तहसीलदार श्री योगेश्वर टोंपे साहेब हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित करण्यात आले होते. या वेळी दैनिक प्रीतिसंगम व एन २४ फोर मराठी न्यूज चॅनल खानापूर तालुका व विटा शहराचे ज्येष्ठ पत्रकार कोंविड योद्धा सामाजिक कार्यकर्ते श्री शिराज (भैय्या) शिकलगार या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात आले. या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस ॲकडमीचे संचालक गुरूजण श्री सतीश सुर्वे (सर) यांच्या उपस्थितीत व प्रमुख पाहुणे तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब व शिराज शिकलगार सह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. व सतीश सुर्वे सर यांच्या शुभहस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नेताजी सुभाषचंद्र बोस ॲकडमीचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत सतीश सुर्वे सर यांनी प्रास्ताविक केले. तर विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब यांनी विद्यार्थ्यांना अनमोल बहुमूले असे मार्गदर्शन करत . तहसीलदार श्री टोपे साहेब यांनी या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी तसेच विविध स्पर्धा परीक्षा बद्दल योग्य मार्गदर्शन देत. हीच वेळ आहे की आपणाला काय बनायचं आहे. विद्यार्थ्यांनो मोबाईलचा योग्य कामासाठी वापर करा. असे म्हणत आई-वडिलांनी केलेले पालन पोषण व आपल्यावर टाकलेली जबाबदारी हे मात्र लक्षात घेणे फार गरजेचे असल्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी विद्यार्थ्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून. महाराजांनी स्वराज्यासाठी आपल्याला माहित आहे त्यांना किती संघर्ष करावा लागला. सहजासहजी एकादी गोष्ट मिळत नसते त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी संघर्ष करावा लागतो. असेही म्हणत विद्यार्थ्यांनो तयारीला लागा. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना. समाजामध्ये कसे वापरावे. आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टी करू नये. आयुष्यात आपले विचार हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत कारण आपणच आहे आपल्या जीवनाचे शिल्पकार. मैत्री करताना सुद्धा आपण योग्य विचार योग्य मैत्री करणे तितकच गरजेच आहे. मुलींनी सुद्धा इतर गोष्टीत न लक्ष देता मोबाईल मध्ये जास्त न लक्ष देता आई-वडिलांचा आदर्श आणि आपली काही जबाबदारी लक्षात घेता मला काहीतरी बनायचं आहे हे लक्षात घेऊन आपण आता ग्राउंड वर उतरला आहात तर भरपूर परिश्रम घ्या जिद्द आणि चिकाटी सोडू नका 100% यश आल्याशिवाय राहणार नाही. सतीश सुर्वे सर यांचेही प्रमुख पाहुणे यांनी कौतुक करत. शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण तुमच्यामुळे विद्यार्थ्यांना यश प्राप्त होत आहे. अकॅडमीचे सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना अनमोलचे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब यांनी केलेलं अनमोल मार्गदर्शन व शिकलगार साहेबांनी केलेल्या मार्गदर्शन या विचाराची धारा आम्ही नक्कीच जपून असे विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
👉🏿 गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घेऊन अत्यंत हलाकीत शून्यातून विश्व निर्माण करत नेताजी सुभाषचंद्र बोस ॲकडमीचे केवळ ४ विद्यार्थ्यावर सुरू करण्यात आली. सतीश सुर्वे सर यांनी विद्यार्थ्याकडून प्रवेश फि शुल्क मिळेल त्या पद्धतीने घेत पहिले शिका नंतर फीच बघू असा आधार विद्यार्थ्यांना दिला.९ वर्ष नेताजी सुभाषचंद्र बोस ॲकडमीचे पूर्ण होत १० व्या वर्षात या ॲकडमीची सुरवात झाली. बरेच विद्यार्थी या अकॅडमी मधून उंच पदावर शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. खानापूर विटा तहसीलदार योगेश्वर टोंपे व पत्रकार शिराज शिकलगार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस ॲकडमीचे या बद्दल अभिनंदन व कौतुक केले.