विटा येथील शासकीय खात्यातील देवमाणूस ; तहसीलदार योगेश्वर टोंपे

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी : ( शिराज शिकलगार ) सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खानापूर विटा तहसीलदार पदी नवनिर्वाचित तरुण तडफदार व कर्तव्यदक्ष दमदार कामगिरी करणारे व सामान्य नागरिकांसह सर्वांना समान योग्य न्याय देणारे. चुकीच्या जागी चूक व बरोबरीच्या जागी बरोबर हे चिन्ह ते कधीच विसरणार नाहीत आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना अशा गोष्टीबाबत योग्य वेळी योग्य सल्ला. तसेच शब्दापेक्षा कागदाला महत्व त्यातूनही सामान्य माणसांची काय व्यथा हे जाणून घेऊन सरकारी कागद या संदर्भात योग्य मार्गदर्शन करणारे धडाकेबाज दमदार कामगिरी करणारे सन्माननीय खानापूर विटा तहसीलदार म्हणून श्री योगेश्वरी टोंपे साहेब यांनी खानापूर विटा तहसीलदार पदाची जबाबदारी हाती घेतली. तालुक्यासह विटा शहरात येणाऱ्या तमाम नागरिकांना न्याय व सन्मान देण्याचे काम सन्माननीय तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब यांनी केले. शासकीय नियमाचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. शिवाय तहसीलदार कार्यालयातील सर्व जबाबदार पदाधिकारी यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन व योग्य सल्ला देत. आपलं काम काय आहे व आपल्या कामाची काय जबाबदारी आहे. हे सुद्धा सर्व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन प्रत्येकाच्या अडचणी समस्या अधिकाऱ्यांच्या जाणून घेऊन व येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सुद्धा योग्य वेळी योग्य सल्ला देऊन प्रश्न कसे सुटतील. या संदर्भात अत्यंत चांगली कामगिरी तहसीलदार टोंपे साहेबांनी पार पडली. मी अधिकारी आहे असे कधीच ते स्वतःला म्हणत नाहीत. मात्र जनतेला मानसन्मान देऊन आपल्या आलेल्या तक्रारी या संदर्भात सर्व माहिती घेऊन योग्य सल्ला व जास्तीत जास्त आपापसात कशा मिटवता येतील कदाचित तक्रारीचा निवारण कसं करता येईल. याबाबत मात्र नक्कीच चांगले काम साहेबांच्या कडून होत आहे. कमी कालावधीमध्ये खानापूर तालुक्यासह विटा शहरात अत्यंत लोकप्रियता ठरलेले तहसीलदार म्हणून योगेश्वर टोंपे साहेब यांचे नाव घेतले जाते. स्वतः साहेब तालुक्यामध्ये सतत वेळोवेळी शासकीय कामासंदर्भात ग्रामीण भागातून सुद्धा फेरफटका मारताना दिसून येत आहेत. खानापूर विटा तहसीलदार कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व ग्रामीण भागात ते भेट देऊन अनेकांच्या समस्या अडचणी व बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. शिवाय त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य त्यांची काम करण्याची पद्धत त्यांनी सर्वांना लावलेली आपुलकी पुढील व्यक्ती आपल्याजवळ आल्यानंतर त्यांचे काम समजून घेणे असे अनेक गोष्टी कशा मार्गी लागतील आपल्याला इथं काय करायला पाहिजे. असे सर्व प्रश्न कर्तव्यदक्ष धडाडीने सोडवण्याचे काम तहसीलदार साहेब करत आहेत. कोणाच्या विरोधात कोणाची तक्रार असेल तर दोघांना आमने-सामने बोलावून योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन दोन्हीही तक्रारीचे निवारण कागदपत्राची छाननी असे बरेच काही गोष्टी लक्षात घेऊन योग्य न्याय आणि योग्य निर्णय देण्याचे काम साहेबांच्या हातून कमी कालावधीत भरपूर काम होताना दिसत आहे. तालुक्याचा आणि शहराचा अभ्यास करत साहेबांनी अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी सोडवण्याचे काम आल्यापासून केला आहे. त्यामुळे खानापूर विटा तहसीलदार हे जनतेच्या मनामध्ये देव माणूस म्हणून आता चर्चा सर्व तालुक्यात विटा शहरात होताना दिसत आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रमाची पार्श्वभूमी व त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन. जुन्या नव्या आठवणी पहिले दिवस आत्ताचे दिवस या विषयावर अत्यंत चांगलं मार्गदर्शन साहेबांच्या हातून होत असल्याने त्यांच्या कामाच्या कौतुका बरोबर तरुण युवकांनी सुद्धा साहेबांच्या या मार्गदर्शन व कामगिरीचे कौतुकच केले आहे. त्यामुळे सध्या तरी खानापूर विटा एक शासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब यांचे नाव मात्र चांगलेच खानापूर तालुक्यात व विटा शहरात होताना दिसत आहे.